
पुण्यातील नवले पुलावर अपघातानंतर कंटेनर, ट्रकला भीषण आग; पाच ठार, अनेक जण जखमी!
पुणे शहरातील नवले ब्रीज येथे आज पाच वाजण्याच्या सुमारास सातारा रोडवरून पुण्याच्या दिशेने येणार्या कंटेनर, ट्रक आणि चार चाकी वाहन एकमेकांवर आदळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये ट्रक आणि कंटेनरला आग लागली असून या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून दहा पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यातील जखमी नागरिकांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
नवले ब्रीज येथे सातारा रोडवरून पुण्याच्या दिशेने येणारा कंटेनर, ट्रक आणि चारचाकी वाहन एकमेकांवर आदळून विचित्र अपघात घडला आहे. या अपघातामध्ये दहापेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. तर अपघाताच्या घटनेमुळे दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या आहेत.




