
देवरुख नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीकडून नगराध्यक्ष व ७ नगरसेवकपदाच्या उमेदवारांची घोषणा
देवरुख नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील घटक पक्षांमध्ये एकमत झाले. नगराध्यक्ष व ७ नगरसेवकपदाच्या उमेदवारांची घोषणा माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी पत्रकार परिषदेत केली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उबाठा गटाच्या सबुरी धरवळ यांच्या जावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आहे एकजुटीने आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
मराठा भवन सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष, नगरसेवकपदाच्या उमेदवारांची घोषणा झाली. नगरसेवक पदांसाठी महेश पवार (शिवसेना ठाकरे गट, प्रभाग क्र. ४), सिद्धी लिंगायत (शिवसेना ठाकरे गट, प्रभाग क्र.५), शर्मिला भुवड (कॉंग्रेस, प्रभाग क्र. ६), वैशाली शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट, प्रभाग क्र. ७), अनुष्का टिळेकर (शिवसेना ठाकरे गट, प्रभाग क्र.९), नीलेश भुवड (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट, प्रभाग क्र. १०) व निदा कापडी (शिवसेना ठाकरे गट, प्रभाग क्र. १५) यांची अधिकृत घोषणा माने यांनी केली.www.konkantoday.com




