
ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याच्या घरी लाखोंचे दागिने चोरणार्या मोलकरणीला २ वर्षाचा कारावास
ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याच्या घरी काम करणार्या महिलेने दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर न्यायालयाने दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती हाके यांनी ही शिक्षा सुनावली आहे. वैष्णवी नलावडे (४२) असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे.
’सोलगाव, भटवाडी येथील चंद्रकांत शेलार हे पत्नीसोबत राहतात. आरोपी वैष्णवी नलावडे ही त्यांच्याकडे घरकाम करत – होती. तिने ८ मार्च २०२५ रोजी दागिन्यांची चोरी केली. कपाटाच्या ड्रॉव्हरमधील २ लाख ८ हजारांचे दागिने व पाच हजारांची रोख रक्कम चोरली. शेलार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी वैष्णवीला चिपळूण बस स्थानकात ताब्यात घेतलें. या प्रकरणाची सुनावणी ३ जून २०२५ रोजी सुरू झाली तेव्हापासून वैष्णवी तुरुंगामध्ये होती या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून सचिन बळीप यांनी काम पाहिले. सहाय्यक सरकारी वकील भालचंद्र सुभाष सुपेकर यांनी सरकार पक्षाच्यावतीने काम पाहिले.. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी वैष्णवी हिला शिक्षा सुनावली.www.konkantoday.com




