
कोकण व कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी काजू गोदामांसाठी राज्य पणन मंडळाची खास योजना
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने संपूर्ण कोकण तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यांसाठी काजू फळपीक विकास योजनेंतर्गत गोदाम उभारणी योजना जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक असलेल्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
राज्य सरकारने संपूर्ण कोकण विभाग तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज आणि राधानगरी या तालुक्यांसाठी काजू फळपीक विकास योजना राबवण्याचे ठरवले आहे. त्याच्या अंतर्गत राज्य कृषी पणन मंडळाने गोदाम उभारणीसाठी एक योजना आणली आहे. गोदाम उभारणीसाठी इच्छुक ग्रामस्थांना विशिष्ट प्रमाणात अनुदान देण्याचे हे धारण आहे. काजू बी तयार झाल्यानंतर तिची वर्षभर साठवणूक करावी लागते. योग्य स्वरुपाची साठवणूक, नसेल तर बी फुकट जाते. हा अनुभव लक्षात घेऊन योजना तयार करण्यात आली आहे.
www.konkantoday.com



