
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावात बंद बंगला फोडून साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव मुरलीधर अळी येथील अजय परशुराम पांचाळ (४३) यांचा बंद बंगला फोडून रोख रक्कम व दागिने असे ६ लाख ३४ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. दोन दिवसापूर्वी घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा चोरीची घटना उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अजय पांचाळ हे शुक्रवारी सकाळी मुबंईवरून गावी आले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. पाठीमागील दरवाजा उघडा दिसल्याने व आतील कपाट फोडलेले दिसल्याने घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दोन कपाटातील ६ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. यामध्ये सोन्याचे ब्रेसलेट, चार अंगठ्या, बुगडी, बोरमाळ, मंगळसूत्र आणि २५ हजार रुपये असा ऐवज चोरीला गेला आहे. साखरपा पोलिसांना याची माहिती दिली असता त्वरित साखरपा पोलीस घटनस्थळी दाखल झाले व कार्यवाही सुरु केली. या वेळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ, फॉरन्सिक विभाग यांना पाचरण करण्यात आले. ’डीवायएसपी सुरेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे करीत आहेत.
www.konkantoday.com




