
वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन आर्थिक तरतूद केली तर काम मार्गी लागेल- खासदार नारायण राणे
वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्गाचा सर्व्हे झाला आहे. फक्त निधीचा प्रश्न आहे. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही. त्यामुळे ते थांबले आहे. जर महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन आर्थिक तरतूद केली तर ते मार्गी लागेल.मात्र ते होईल, या रेल्वे मार्गाची आपली अग्रक्रमाने मागणी असल्याचे खा. नारायण राणे यांनी सांगितले.
वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग गेल्या अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे. या मार्गाचा सर्व्हेदेखील झाला आहे. मात्र आर्थिक तरतुदीअभावी हे काम रखडले आहे. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग झाल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार उदिमाला अधिक चालना मिळणार आहे. शिवाय बंदर विकासालाही बळ मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग होण्यासाठी खा. नारायण राण्ो यांचा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे




