
राज्य कॅरम स्पर्धेत प्रशांत-समृद्धीला प्रथम मानांकन
गुहागर : कै. नीला परचुरे व मधुकाका परचुरे यांच्या स्मरणार्थ प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स गुहागर यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने भंडारी भवन गुहागर येथे ८ नोव्हेंबरपासून संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटात मुंबईच्या प्रशांत मोरे प्रथम व ठाण्याच्या झैद अहमद फारुकीला द्वितीय, तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकला प्रथम व रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता होणार असून पुरुष एकेरी गटाने सामन्याची सुरुवात होईल. स्पर्धेतील महत्त्वाचे सामने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून थेट प्रसारित करण्याची व्यवस्था असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
पुरुष एकेरी गटातील विजेत्या खेळाडू रोख रुपये २५ हजार व चषक, तर महिला एकेरी गटातील विजेतील रोख रुपये ८ हजार व चषक देण्यात येणार असून प्रत्येक गटातील पहिल्या ८ खेळाडूंना रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. अंतिम फेरीचे सामने अनुक्रमे महिला एकेरी दुपारी २ वाजता व पुरुष एकेरी दुपारी ४ वाजता खेळविण्यात येतेल. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे.
पुरुष एकेरी मानांकन : १. प्रशांत मोरे (मुंबई), २. झैद अहमद फारुकी (ठाणे), ३. विकास धारिया (मुंबई), ४. सागर वाघमारे (पुणे), ५. अभिजीत त्रिपनकर (पुणे), ६. समीर अंसारी (ठाणे), ७. रियाझ अकबर अली (रत्नागिरी), ८. हरेश्वर बेतवंशी (मुंबई).
महिला एकेरी मानांकन : १. समृद्धी घाडीगावकर (ठाणे), २. आकांक्षा कदम (रत्नागिरी), ३. प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४. मिताली पाठक (मुंबई), ५. केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), ६. अंबिका हरिथ (मुंबई), ७. रिंकी कुमारी (मुंबई), ८. सोनाली कुमारी (मुंबई).




