
युवा पत्रकार मुझम्मील काझी वर्ल्ड फॉर नेचर इंडिया,रत्नागिरीच्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी : युवा पत्रकार, गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाचे संपादक मुझम्मील काझी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान वर्ल्ड फॉर नेचर इंडिया,रत्नागिरी या संस्थेच्या वतीने करण्यात आला. या संघटनेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त निसर्ग मित्र मेळावा आणि पहिला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
मुझम्मील काझी यांच्या नावाची शिफारस वर्ल्ड फॉर नेचर इंडिया,रत्नागिरी या संस्थेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रथमेश पवार यांनी केली. मुझम्मील काझी यांच्या कार्याची दखल घेत हे पुरस्कार देण्यात आला.
हा सन्मान सोहळा चिपळूण येथे झाला असून या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे, महाराष्ट्र अध्यक्ष अभिजित वाघमोडे,रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रथमेश पवार, वनविभागीय अधिकारी चिपळूण रत्नागिरी गिरिजा देसाई,ग्लोबल चिपळूण टूरिझमचे रामशेठ रेडीज, बापू काणे,विलास महाडिक, पर्यावरणतज्ज्ञ धीरज वाटेकर इत्यादी मंचावर उपस्थित होते.




