
पाऊस गेला, आता आली थंडी!राज्यात ‘या’ ६ जिल्ह्यांत ‘गारठा’ वाढणार!
महाराष्ट्रात पाऊस संपल्यानंतर थंडीची लाट येण्याची शक्यताय. हवामान विभागाने १० नोव्हेंबरपासून राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमान घसरण्याचा अंदाज वर्तविला. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात कडाक्याचा गारठा जाणवणार आहे.
महाराष्ट्रात आता हवामानाने स्पष्ट कलाटणी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी थंडीची चाहूल आता गारठ्यात बदलत आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, १० नोव्हेंबर पासून राज्याच्या बहुतांश भागांत किमान तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आणि शेतकऱ्यांनी पिकांसाठी विशेष काळजी घेण्याची हीच योग्य वेळ आहे.
संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण अनुभवता येईल.
पश्चिम महाराष्ट्र पुणे ३१°C १४°C कडाक्याचा गारठा
मराठवाडा (सर्वाधिक) छत्रपती संभाजीनगर ३१°C ११°C थंडीचा मोठा तडाखा
विदर्भ नागपूर २८°C १४°C कोरडे आणि थंड
मुंबई ३४°C १८°C दिवसा उष्ण, रात्री गारवा
१० नोव्हेंबर रोजी कोकणातील ६ जिल्ह्यांमध्ये – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग – हवामान कोरडे आणि उष्ण राहणार आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४°C आणि किमान तापमान १८°C पर्यंत खाली येऊ शकते.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये थंड आणि कोरडे वातावरण राहील. विशेषतः छत्रपती संभाजीनगर येथे किमान तापमान ११°C पर्यंत खाली घसरल्याने थंडीचा जोर सर्वाधिक जाणवेल.
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर (नगर) जिल्ह्यांत निरभ्र आकाशामुळे वातावरणात चांगलाच गारवा पसरेल. पुण्याचे किमान तापमान १४°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
विदर्भातील नागपूर शहरात कमाल तापमान २८°C तर किमान तापमान १४°C पर्यंत राहण्याची शक्यता आहे.




