
आधारशी पॅन लिंकिंगची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढली!
आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने ३१ – डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत नव्याने वाढवली असून, आधार कार्ड पॅनशी न जोडल्यास तुमचे पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून निष्क्रिय होणार आहे. पॅनकार्ड निष्क्रिय झाल्यास तुम्हाला ना प्राप्तिकर भरता येईल, ना रिफंड मिळेल. एवढेच नव्हे, तर पगार बँक खात्यात जमा होणेदेखिल जवळपास अशक्य होणार आहे. कर क्षेत्रातील तज्ज्ञांनीही लवकरात लवकर पॅन आणि आधार लिंक प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि करांशी संबंधित कामे सुरळीत सुरू राहातील.www.konkantoday.com




