
राजापूर तालुक्यातील तब्बल २२ शाळा १० वर्षापासून स्वमालकीच्या इमारतीच्या प्रतिक्षेत
शाळांमध्ये दर्जेदार भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, आजही स्वमालकीच्या इमारतीअभावी तालुक्यातील तब्बल २२ शाळा गेल्या १० वर्षाहून अधिक कालावधीपासून भाड्याच्या जागांमध्ये भरवल्या जात आहेत. ज्या इमारतींमध्ये या शाळा भाडेतत्वावर भरत आहेत, त्या ६३ वर्गखोल्यांच्या जागांचे भाडे देण्यासाठी दरमहा तब्बल ३० ते ३५ हजार रुपये खर्च केले जात आहेत.
शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार्या शासनाकडून शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. शाळांमध्ये सुंदर इमारत बांधण्यासाठी यासाठी शासनातर्फे सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. त्यातून चांगल्या दर्जेदार इमारती बाधल्या जात आहेत. मात्र, आजही स्वमालकीच्या इमारतींची प्रतीक्षा राहिली आहे. त्यामध्ये पहिली ते सातवीपर्यंत १३ तर पहिली ते चौथीपर्यंत ८ शाळांचा समावेश आहे. या शाळा ६३ खोल्यांमध्ये आजही भाड्याच्या इमारतीमध्ये भरत आहेत. यासाठी शासनाकडून दरमहा ३० ते ३५ हजार रुपये खर्च केले जात आहेत. यामध्ये ५० रुपयापासून १२ हजार रुपयांपर्यंतच्या भाड्याचा समावेश आहे.
www.konkantoday.com




