
मोबाईल पडला म्हणून चक्क मंगला एक्स्प्रेसची चेन ओढून ट्रेन थांबविली, संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल
मंगला एक्स्प्रेस (१२६१८ हज्रत निजामुद्दीन एर्नाकुलम) या गाडीमध्ये एका प्रवाशाने मोबाईल फोन खाली पडल्याच्या कारणावरून अलार्म चेन ओढून ट्रेन थांबविल्याची धक्कादायक घटना २३ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. या प्रकरणी कोकण रेल्वेकडून संबंधित प्रवाशावर भारतीय रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४१ अंतर्गत नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडी घटने दरम्यान दिवाणखावटी आणि कलंबणी बुद्रुक या स्थानकांच्या दरम्यान होती. खिडकीतन मोबाईल खाली पडला म्हणून प्रवाशाने चेन ओढली. त्यानंतर गाडी अनधिकृतपणे थांबली आणि त्या प्रवाशाने रेल्वे रुळावर उतरून स्वतःचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती उपस्थित टीटीई पी. एम. कृष्णन व अजित जाधव (HTE/ PNVL) यांनी तत्काळ वरिष्ठांना दिली.
त्यांच्या लेखी अहवालाच्या आधारे रेल्वे पोलिसांनी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. कोकण रेल्वेका प्रशासनाने ही बाब अत्यंत गंभीरतेने घेतली असून सर्व प्रवाशांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की अलार्म चेनचा वापर फक्त वैद्यकीय वा वैयक्तिक तातडीच्या आणि जीवितास धोका असलेल्या प्रसंगीच करावा. त्याचा विनाकारण वापर केल्यास गंभीर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
www.konkantoday.com




