
अनेक महिने प्रतीक्षेत असलेली न.प. निवडणुकीत इच्छूक उमेदवारांना मिळणार प्रचारासाठी चार दिवस; अपक्षांची होणार पळापळ
रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले असून रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी मतदान दि. २ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची धावपळ होणार आहे. कारण त्यांना प्रचारासाठी मिळणारा अवधी केवळ चार दिवसांचा राहाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नुकताच कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी हरकती दाखल नाहीत, त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी श्रेण्याची मुदत दि. २१ नोव्हेंबरपर्यंत आहे. तर, हरकती दाखल असलेल्या ठिकाणी दि. २५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. परिणामी २६ नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होऊन चिन्हवाटपाची प्रक्रिया होणार आहे. या कार्यक्रमानुसार दि. ३० नोव्हेंबर रोजी प्रचाराची मुदत संपेल आणि २ डिसेंबरला मतदान होणार आहे. म्हणजेच अपक्ष उमेदवारांच्या हातात प्रचारासाठी फक्त चार दिवसांचा अवधी राहाणार आहे. या अल्प कालावधीत स्वतःची ओळर चिन्ह आणि प्रचार संदेश जनतेपात पोहोचवणे ही त्यांच्यासमोरची सर्वात मोठी परीक्षा ठरणार आहे.www.konkantoday.com




