
समुद्रकिनार्यावर भरधाव वेगाने वाहने चालवणार्या दोन पर्यटकांविरूद्ध पोलिसांनी केली कारवाई
कोकणातल्या समुद्रकिनार्यावर अनेक पर्यटक आपली चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालवत असल्याचे प्रकार घडत असून याबाबत पोलिसांनी अशी वाहने चालविण्यास बंदी केली आहे. तरी देखील ही बंदी झुगारून वाहने चालवणार्या दोन पर्यटकांविरूद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.
दापोली तालुक्यातील आंजर्ले किनार्यावर दिनेश बाबरूवान चव्हाण (रा. पिंपरी चिंचवड पुणे, सध्या रा. आंजर्ले भंडारवाडा) याने दि. ५.११.२५ रोजी आंजर्ले समुद्रकिनारी आपल्या ताब्यातील इको चारचाकी वाहन समुद्रकिनारी भरधाव वेगाने चालवित स्वतःचे व समुद्रकिनारी असणार्या इतर पर्यटकांना दुखापत होईल याची जाणीव असताना देखील धोकादायक रितीने समुद्रकिनारी वाळूवर व पाण्यात भरधाव वेगाने चालविले म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्या एका प्रकारात दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी आरोपी तुकाराम सोन्या बापू पवार (रा. नाशिक) याने आपल्या ताब्यातील इर्टिका चारचाकी वाहन समुद्रकिनारी भरधाव वेगाने चालवून पर्यटकांना धोका होईल असे वर्तन केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अतिउत्साही पर्यटकांना आळा बसेल अशी आशा व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com




