
श्री धुतपापेश्वर मंदिराच्या सुशोभिकरणाचा सुमार दर्जा, उबाठा सेनेची तक्रार
तत्कालिन मुख्यमंत्री असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कारकिर्दीत काही कोट्यवधी रूपयांना मंजूरी देण्यात आलेल्या शहरानजिकच्या श्री धुतपापेश्वर मंदिराच्या सुशोभिकरण कामाच्या अवस्थेतील फोलपणा उबाठा सेनेचे राजापूर शहर संपर्कप्रमुख सत्यवान कदम यांनी पुढे आणला आहे. या मंदिराला सुशोभिकरणानंतर भेट दिली असता सभामंडपातील बहुतेक नवनिर्मित खांबांना तडे गेल्याचे निदर्शनाला येत असून कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाल्याने याची थेट तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुशोभिकरणाचे काम आजही अपूर्ण अवस्थेत असल्याचेही दिसून येत आहे. श्रीधूतपापेश्वर हे राजापूरवासियांचे श्रध्दास्थान असून त्या कामाबाबत गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. शहरानजिकच्या धोपेश्वर येथील राजापूरकरांचे प्रमुख दैवत श्रीधूतपापेश्वर मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम तत्कालिन मुख्यमंत्री व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाम उपलब्ध झालेल्या निधीतून करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र त्यानंतर झालेल्या कामाचा दर्जा पाहता साशंकता निर्माण झाली आहे तरी या कामाची चौकशी करून दर्जा सुधारावा अशी मागणी श्री. कदम यांनी केली आहे.www.konkantoday.com




