
पहिल्या मजल्यावरून पडल्यामुळे जखमी झालेल्या प्रौढाचा मृत्यूरत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे घरामध्ये पहिल्या
मजल्यावरून पडून जंखमी झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुनाफ युसुफ मजगांवकर (५६, रा. मुसलमानवाडी, गोळप, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. मुनाफ याला २३ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना २९ ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला अशी नोंद पूर्णगड पोलिसात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




