
गुहागर येथे राज्य कॅरम स्पर्धेला प्रारंभ
गुहागर : प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्यावतीने भंडारी हॉल गुहागर येथे आज राज्य मानांकन कॅरम स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेचे उद्घाटन गुहागर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी राज्य कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते तसेच राज्य व जिल्हा संघटनेचे इतर मान्यवर व प्रदीप परचुरे उपस्थित होते. यानंतर पुरुष एकरी गटाने सामन्यांना सुरुवात झाली.
पुरुष एकेरी प्रथम फेरीचे इतर निकाल असे : अमोघ जोगळेकर (रत्नागिरी) वि वि विक्रांत नाईक (मुंबई) २४-१३, १=२५-१६.
गणेश पाटणकर (रत्नागिरी ) वि वि दिनेश चौले (मुंबई) २५-९, २५-०.
सचिन सुर्वे (मुंबई) वि वि मनविक मराठे (रत्नागिरी) २५-०, २५-०.
राहुल कदम (रत्नागिरी) वि वि अमर इंगळे (ठाणे) २५-१०, २५-१०.
उमेश लोहार (सिंधुदुर्ग) वि वि चिन्मय दरेकर (मुंबई उपनगर) २५-१०, २५-४.
मनोज पाटील (मुंबई) वि वि सोनू वाल्मिकी (मुंबई उपनगर) २५-१३, २५-१०.
मिलिंद जाधव (मुंबई उपनगर) प्रीतम पुराडकर (मुंबई )२५-१५, २५-०.
प्रकाश गोसावी (मुंबई उपनगर) वि वि चेतन कोळी (मुंबई) २५०, २५-०.
हेमंत मोरे ( मुंबई ) वि वि नरेंद्र ढवळे (ठाणे) २५-१, २५-८.
वैभव कांबळे (मुंबई) वि वि सुमित कदम (रत्नागिरी) २२-१३, २५-१.




