
आंब्याला उशीर; काजू, नारळाला वातावरण पोषक -कुलगुरु डॉ. संजय भावे
पावसाचा मुक्कम लांबल्यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसणार आहे. हापूस आब्याचा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार असून शतकर्यांना मेपर्यंत आंब्याचे पीक हातात मिळेल. त्यामुळे जानेवारी अखेरपासून बाजारात दाखल होणारा हापूस आंबा यावर्षी उशिराने दाखल होणार आहे. तर काजू आणि नारळ पिकासाठी सध्याचे वातावरण हे पोषक असल्याचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी सांगितले.
अश्वगंधा लागवड प्रशिक्षण शिबीर व कृषि प्रेरणासत्र या कार्यक्रमासाठी डॉ. संजय भावे देवख येथे आले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. पावसाचा मुक्काम लांबल्याने यावर्षी आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात आंबा पिकाला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरु होते. ही प्रक्रिया तीन टप्प्यात साधारण जानेवारी महिन्यापर्यंत सुरु राहाते. जानेवारी अखेरपासून आंबा बाजारात यायला सुवात होते. दुसर्या टप्प्यातील आंबा मार्चपासून बाजारात दाखल होतो. परंतु यावर्षी मे महिन्यापर्यंत आंबा पीक लांबणीवर पडणार असल्याचे डॉ. भावे यांनी सांगितले. काजू आणि नारळ पीकाला सध्याचे वातावरण हे पोषक असल्याचेही ते म्हणाले.
www.konkantoday.com




