
हर्णे बंदरातून चक्रीवादळामुळे ठप्प झालेली मच्छिमारी पुन्हा सुरू
मोन्थी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे खवळलेला समुद्र व पाऊस यामुळे गेले आठ ते दहा दिवस खाडीत, किनार्यावर विसावलेल्या मच्छीमार बोटी पुन्हा एकदा मासेमारीसाठी समुद्रात गेल्या आहेत. वादळामुळे समुद्रात झालेल्या बदलामुळे मासे सुरक्षितस्थळी गेल्याने मासेमारीला गेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात फक्त बांगडाच मासा सापडल्याची माहिती मच्छीमारांकडून समोर आली आहे भर दिवाळीच्या हंगामात मोन्थो चक्रीवादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीला सोसावा लागला. समुद्राला आलेल्या उधाणामुळे व जोरदार पाऊस-वार्यांमुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी खाड्यांमध्ये व समुद्र किनार्यांवर सुरक्षित केल्या होत्या. अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या नुकसानीत असतानाच मच्छीमारांना देखील नुकसानीचा सामना करावा लागला.
www.konkantoday.com




