
रत्नागिरी शहरानजिकच्या खेडशी येथील लॉजवर चालणार्या देहव्यापार प्रकरणातील मुख्य संशयिताला अटकपूर्व जामीन
रत्नागिरी शहरानजिकच्या खेडशी येथील लॉजवर चालणार्या देहव्यापार प्रकरणातील मुख्य संशयिताला ५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. सलमान नजमुद्दीन मुकादम (३०, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांकडून होणार्या अटकेच्या भीतीने सलमान हा मागील ६ महिन्यांपासून फरार होता. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळताच सलमानने सत्र न्यायालयापुढे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार निंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला.www.konkantoday.com




