
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, शौचालय दुर्गंधीने प्रवासी हैराण
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून याचा मनस्ताप प्रवाशांना करावा लागत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या स्थानकावरील शौचालयाचा चेंबर ओव्हरफ्लो झाला असून दुर्गंधी पसरली आहे. तर काही शौचालये तुंबल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंबंधी शौचालयाच्या साफसफाईचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने रेल्वे प्रशासनाला पत्रही विले आहे. मात्र रेल्वे प्रशासन प्रवाशांना गैरसोयीकडे दुर्लक्षच करत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे एक महत्वाचे स्टेशन आहे. हजारों प्रवासी दररोज या स्थानकावरून प्रवास करत असतात. मात्र प्रवाशांना चांगली स्वच्छतागृह देण्याची मुलभूत गरज देखील पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दोन ठिकाणी महिला व पुरुषांसाठी प्रतीक्षा कक्ष असून त्यामध्ये सार्वजनिक शौचालय व आंघोळीसाठी रुम आहेत. याठिकाणी असलेले काही शौचालय तुंबलेल्या अवस्थेत आहेत. तर बाहेर असणारे चेंबर हे ओव्हरफ्लो झाले असून त्याची दुर्गंधी प्रतीक्षा कक्षामध्ये येत असते. त्यामुळे प्रवासी हे प्रतीक्षा कक्षात थांबण्याऐवजी बाहेरच थांबत असल्याचे दिसून येते. मात्र गाड्यांची वाट पाहत तासन्तास रेल्वे स्थानकावर थांबणार्या प्रवाशांना मजबुरीने या शौचालयांचा वापर करण्याची वेळ येते. बाहेरून चकाचक दिसणार्या या रेल्वे स्थानकावर मुलभूत सोयी मिळत नाहीत.www.konkantoday.com




