
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक : मनसेची जोरदार मोर्चेबांधणी
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर मनसेने काल दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व जागांवर सुशिक्षित, सर्वसमावेशक तुल्यबळ उमेदवार देण्याची चाचपणी केली जात असून मनसेने प्रस्थापितांना घाम फोडण्याचा चंग बांधला आहे.
काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर कार्यालय,अपर्णा कॉम्प्लेक्स,थिबा पॅलेस रोड , मथुरा हॉटेल शेजारी येथील झालेल्या बैठकीत मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव, शहर संघटक श्री अमोल श्रीनाथ, मनविसे जिल्हा अध्यक्ष श्री गुरूप्रसाद चव्हाण या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करून मनसे अध्यक्ष मा .श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत यासाठी प्रयत्नशील राहून कार्यकर्त्यांनी घरांघरात जाऊन जोमाने प्रचार करावा असे आवाहन उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील सध्याची राजकीय परिस्थिती पहाता मनसेची वोटबँक ही अनेक प्रभागात निर्णायक ठरणार असून..मनसेकडे देखील विविध स्तरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मातब्बर उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे..पक्षाच्या कोंकण प्रभारी असलेल्या वरिष्ठ नेत्यांकडे अहवाल सादर करून याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे घेतील असेही मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुका तयारी आणि उमेदवार चाचपणीच्या या बैठकीस मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव, मनसे रत्नागिरी शहर संघटक श्री अमोल श्रीनाथ,मनविसे जिल्हा अध्यक्ष श्री गुरूप्रसाद चव्हाण, आदींसह, उप शहराध्यक्ष श्री राजेश नंदाने, उपशहर अध्यक्ष राहुल खेडेकर,उपशहर अध्यक्ष इम्रान नेवरेकर, विभाग अध्यक्ष अक्षय सुतार, उपतालुका अध्यक्ष सौरभ पाटील, विभाग अध्यक्ष सोम पिलणकर,तालुका सचिव ॲड अभिलाष पिलणकर, महिला उपशहर अध्यक्षा द्वारकाताई नंदाने, शाखा अध्यक्ष अप्पू सुतार,शाखा अध्यक्ष फरदीन गुहागरकर,शाखा अध्यक्ष प्रसाद भाटकर , विभाग अध्यक्ष दिलीप नागवेकर,तेजस नागवेकर, विशाल सुवरे,तीर्था प्रसाद भाटकर, प्रथम बेग आदिसंह अनेक मनसे पुरुष, महिला पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.




