
मंडणगड येथे दुकानातून ३१ तंबाखू पाकिटे जप्त; दुकानमालकावर गुन्हा
मंडणगड बाजारपेठेतील एका दुकानातून तब्बल ३ हजार ५२० रुपये किंमतीची तंबाखूची ३१ पाकिटे पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजता करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत नामदेव कपडेकर (वय ५६, रा. भिंगळोली, दापोली फाटा, हॉटेल मंडणगड ढाब्यासमोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानमालकाचे नाव आहे.
तक्रारीनुसार, कपडेकर यांच्या ‘महालक्ष्मी ट्रेडर्स’ या दुकानात महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अधिसूचनेद्वारे पूर्णतः प्रतिबंधित केलेले विमल पान मसाला आणि सुगंधी तंबाखू बेकायदेशीरपणे साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. संबंधित साहित्य जप्त करून दुकानमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
………………………




