
डॉ. आंबेडकर स्मारक आराखडा तयार करा, मंत्री योगेश कदम यांचे आदेश
मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या व नवीन स्मारकाचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले.
मंडणगड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या निर्मितीसाठी मंत्रालयात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, समाज कल्याण व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सद्यस्थितीत असलेले डॉ. आंबेडकर यांचे स्मारक व नवीन स्मारकासाठी एकत्रित प्रारुप आराखडा समाजकल्याण विभागाने तयार करावा, अशा सूचना बैठकीत दिल्या.
www.konkantoday.com




