
बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक वालम यांचे गुहागरात स्वागत

कोकणात मुसळधार पावसामुळे शेतीचे व आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेण्यासाठी व शेतकऱ्यांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक वालम हे गुहागर दौऱ्यावर आले आहेत. गुहागर शिवाजी चौक येथे बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी पक्षप्रमुख अशोक वालम यांचे भगवी शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच बळीराज सेना महिला संघटनेच्या गुहागर तालुका संघटनेच्या वतीने महिलांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी श्री. वालम यांच्यासोबत शामराव पेजे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ, बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, उपाध्यक्ष सुरेश भायजे, चिटणीस संभाजी काजरेकर, विधानसभा संपर्कप्रमुख शरद बोबले, दक्षिण रत्नागिरी अध्यक्ष तानाजी कुळे, गुहागर तालुका सह संपर्कप्रमुख मनोहर घुमे, अमित काताळे, तालुकाध्यक्ष अरुण भुवड, महिला आघाडी अध्यक्ष श्रावणी शिंदे, विधानसभा महिला आघाडी प्रमुख ऐश्वर्या कातकर, स्वप्नाली डावल, तालुका सचिव श्वेतांबरी मोहिते, तृप्ती शिगवण, गजानन मांडवकर, लोटे विभाग प्रमुख सुभाष हुमणे, तालुका उपाध्यक्ष संतोष पाष्टे, युवक अध्यक्ष विवेक जांगली, विनायक घाणेकर, नामदेव अवरे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.




