
दापोली तालुक्यातील अंजर्ले समुद्रकिनारी अति उत्साही पर्यटकांनी पुन्हा एकदा चार चाकी गाडी समुद्रकिनारी घातल्याने अडकली
दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी अति उत्साही पर्यटकांनी वाहने चालवून वाळूत रुतण्याचा प्रकार घडला आहे समुद्रकिनाऱ्यावर चार चाकी वाहने नेण्यास बंदी असताना देखील या उत्साही पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर गाडी नेली त्यामुळे पर्यटकाची गाडी वाळूत व पाण्यात रुतल्याने अडकल्याची घटना बुधवारी घडली
* पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर वाहने चालवू नयेत त्यासाठी पोलिसांनी सूचना फलक लावले आहेत तर काही ठिकाणी बॅरॅकेट्सही उभे केले आहेत मात्र काही उत्साही पर्यटक हे बॅरॅकेट्स हटवून समुद्रकिनाऱ्यावर वाळूत चार चाकी वाहने नेत आहेत काही दिवसापूर्वी अशी वाहने नेणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली होती मात्र तरी देखील पर्यटकांकडून असे प्रकार सुरूच असल्याने स्थानिक आणि नाराजी व्यक्त केली आहे




