
कार्यालये/विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणुका काढण्यास घोषणा/सभा घेण्यास निर्बंध
रत्नागिरी, दि. 6 ) :- नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक कालावधीमध्ये जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय अधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डीग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादी बाबी नियंत्रित करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेशित केले आहे.
सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढण्यात आले असल्याचे नमूद केले आहे. मा. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 साठीचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषीत केला आहे. त्याअनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका 2025 आदर्श आचारसंहितेबाबत संदर्भिय एकत्रित आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय अधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डीग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादी बाबी नियंत्रीत करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल, मा. राज्य निवडणूक आयोगाकडील 4 नोव्हेबर 2025 रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेल्या निर्देशास अनुसरुन तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहीता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आचारसंहितेचा कालावधीमध्ये निर्बंध घातले आहेत.
प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनी क्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन प्रसिध्दी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.




