
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मिर्या-नागपूर महामार्गाच्या कामाला ब्रेक
मिर्या-नागपूर महामार्गाच्या कामाला आधीच उशीर झालेला असताना आता पावसामुळे या कामाला ब्रेक लागला आहे. पावसाळ्यानंतर शहरातील महामार्गावरील ठिकठिकाणच्या चौकाचे काम पूर्ण होईल आणि महामार्गाचेही प्रश्न मार्गी लागतील असे वाटत असतानाच कामे मंदावली आहेत. अर्धवट कामामुळे नागरिकांना, विशेषतः वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रत्नागिरी शहर आणि परिसरात गेली दोन वर्षे मिर्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. वर्ष २०२५ च्या अखेर हे काम पूर्ण होईल, असा दावा काम करणार्या कंत्राटदार कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र नोव्हेंबर २०२५ उजाडले तरी महामार्गाचे शहरातील ५० टक्के कामही पूर्ण झालेले नसल्याचे दिसून येत आहे. मिर्या गावच्या हद्दीपासून पुढे परटवे परिसरातील भूसंपादन कामातील अडचणी दूर केल्यानंतरही या परिसरातील महामार्गाचे काम गेली दोन वर्षे जैसे थे स्थितीतच पहायला मिळत आहे. परिसरात सुरू असलेल्या खोदकामामुळे शहराबाहेरून असलेल्या सोयीस्कर बायपास मार्ग आता अपघातप्रवण मार्ग झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com




