
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज दीपोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी : प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दिव्यांची पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रत्नागिरीतील शिवतीर्थ, मारुती मंदिर सर्कल येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी यांच्या वतीने “त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव २०२५”चे आयोजन करण्यात आले आहे.
आज (५ नोव्हेंबर) सायंकाळी ७.३० वाजता नागरिकांनी मोठ्या संख्येने शिवतीर्थ, मारुती मंदिर सर्कल येथे उपस्थित राहावे. तसेच अधिक माहितीसाठी ७०२००२४२४२, ९९२२४२९५७७
या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




