
रोहित आर्यचा एन्काऊंटर प्रकरणात माजी मंत्रीदीपक केसरकर यांचा खुलासा,
ओलीस नाट्य घडत होतं तेव्हा रोहित आर्य याने पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क करून द्या असे सांगितले होते. त्यानंतर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जेव्हा केसरकर यांच्याशी त्याचा संपर्क साधून दिला त्यावेळी रोहित आर्य याच्याशी बोलायला केसरकर यांनी नकार दिला.यावरून माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. रोहित आर्य सोबत बोलण्यास नकार का दिला?
रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आहे. पवई येथील तीन तासांच्या ओलीस नाट्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. १७ अल्पवयीन मुलांना मुंबईतील पवई परिसरातील एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. मात्र हे ओलीस नाट्य घडत होतं तेव्हा रोहित आर्य याने पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क करून द्या असे सांगितले होते. त्यानंतर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जेव्हा केसरकर यांच्याशी त्याचा संपर्क साधून दिला त्यावेळी रोहित आर्य याच्याशी बोलायला केसरकर यांनी नकार दिला. यावरून माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. रोहित आर्य सोबत बोलण्यास नकार का दिला?
रोहित आर्याचा एन्काऊंटर होईल, हे कोणालाच माहिती नव्हतं. रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवलं होतं, त्यामुळे मुलांचा जीव वाचवणं त्यावेळी महत्त्वाचं होतं. रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, पण मी मंत्री नसल्याने ते देऊ शकत नव्हतो. मंत्रीच अशा प्रकरणात आश्वासन देऊ शकतात, अधिकारी तेवढंच सांगू शकतात. मला जर केवळ संवाद साधण्याची विनंती केली असती, तर मी बोलण्याचा विचार केला असता. मात्र, ठोस आश्वासन देण्याचे अधिकार माझ्याकडे नव्हते.तसेच मला एकदाच पोलिसांकडून संपर्क झाला होता. आणि ते ऑन रेकॉर्ड आहे. मी त्यावेळी सांगितलं, मी आश्वासन देऊ शकत नाही, कारण मी आता मंत्री नाही. मुलं ओलीस ठेवली आहेत, त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ आहेत. असं समजल्यावर सावधगिरी बाळगावी लागली. त्या क्षणी मुलांची सुटका हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. त्या घटनेत एन्काऊंटर होईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. ठोस आश्वासन देण्याचा अधिकार फक्त मंत्र्यांकडे असतो, माझ्याकडे नाही. जर मला सांगितलं असतं की, त्याला फक्त संवाद हवा आहे, तर मी नक्की बोललो असतो. रोहित आर्याला त्या वेळी ठोस आश्वासन आवश्यक होतं, पण ते देण्याची कॅपॅसिटी माझ्याकडे नव्हती, असे दीपक केसरकर म्हणाले.
त्याचप्रमाणे माझी चौकशी अवश्य व्हावी. कारण माझ्याकडे जे अधिकार नाहीत, ते सर्वांसमोर स्पष्ट झाले आहेत. मला चौकशीत बोलावले, तर मी माझं म्हणणं देईन




