
कांगवई गवळवाडी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
दापोली : कांगवई गवळवाडी ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामीण मंडळाची स्वगृही वापसी झाली असून सर्व ग्रामस्थांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी उबाठाचे शाखाप्रमुख सुभाष साळवी यांनी देखील पक्षप्रवेश केला. .
“शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गावा-गावातील वाद मिटवून गेली २० वर्षे राजकारणात मी उभा आहे. १९९० साली जशी शिवसेना उभी होती, तशी शिवसेना नव्याने आपल्या कांगवई गावात उभी राहते आहे, याचे समाधान आहे, असे ना. कदम म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग महाडिक आणि अनिल पेडणेकर यांच्या निवासस्थानी ना. कदम यांनी भेट दिली.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, मुंबईतून आलेले कांगवई, गवळवाडी गावचे ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामीण मंडळाचे सभासद, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत साळवी, शाखाप्रमुख सचिन जाधव, ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष किसन तटकरे, मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष रघुनाथ महागावकर, कांगवईच्या माजी सरपंच सौ. सुमन खेडेकर, शिवसेना पदाधिकारी, तोंडली गावचे ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




