
अन्यथा कुजलेले भात कार्यालयात जमा करू, नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले
अतिवृष्टी, अवकाळी पावसाने आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. वर्शभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला मदत करताना हात आखडता घेवू नये. शंभर दोनशे रुपयांची नुकसान भरपाई आम्हाला नको. नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये पाहिजेत. तसे झाले तर ठीक नाही तर शे-दोनशे आणि कुजलेले भात तहसिलदार कार्यालयात जमा करू, असा गंभीर इशारा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी सोमवारी तहसिलदारांना दिला.
पावसामुळे कोकणातील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जगाच्या पोशिंद्याला त्याच्या कष्टाची योग्य किंमत मिळावी, शासनाकडून त्याची उपेक्षा होवू नये, यासाठी शनिवारी मनसे वाहतूक शाखेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांच्या नेतृत्वाखाली धडक दिली.www.konkantoday.com




