
“वर्ल्ड फॉर नेचर इंडिया” संस्थेतर्फे पुरस्कारांसाठी नामांकने दाखल करण्याचे आवाहन
निसर्ग संवर्धन व वन्यजीवांसाठी तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या “वर्ल्ड फॉर नेचर इंडिया” या सामाजिक संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेला यावर्षी ५ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संस्थेचा पहिलाच “निसर्ग मित्र मेळावा” व पहिला “राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२५” मित्र मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन चिपळूण येथे १६ नोव्हेंबर रोजी केले आहे.
समाजातील तळागाळातील व्यक्तींचा योग्य सन्मान व्हावा हा मुख्य उद्देशाने वन्यजीव, पर्यावरण, सामाजिक शैक्षणिक, साहित्य, पत्रकारिता,सांस्कृतिक तसेच कृषी सारख्या अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान संस्थेच्या वतीने केला जाणार असून, त्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंत विविध पुरस्कारांसाठी एक हजार रुपये प्रवेश शुल्कासह अर्ज दाखल करावा.
नामांकनासाठी 9356118438, 9527415560 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन वर्ल्ड फॉर नेचर इंडिया संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे केले आहे.
वन्यजीव, निसर्ग संवर्धन पर्यावरण क्षेत्रासाठी “सह्याद्री रत्न निलेश बापट आदर्श वन्यजीव रक्षक पुरस्कार २०२५”, वर्ल्ड फॉर नेचर आदर्श निसर्ग सेवक पुरस्कार २०२५ तसेच शैक्षणिक व इतर क्षेत्रांसाठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार २०२५”, राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार २०२५, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५, राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार २०२५, राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५, राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार २०२५, राज्यस्तरीय आदर्श प्रगतशील शेतकरी पुरस्कार २०२५, राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संघटना २०२५ अशा विविध पुरस्कारांनी चमकदार कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आणि सामाजिक संघटनांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
पुरस्कारांचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे आहे. समारंभासाठी उपस्थित सर्वांना सकाळी चहा नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा संस्थेच्या वतीने दिला जाणार आहे. या पुरस्कारांची निवड पाच जणांची समिती करणार असून, करत असलेल्या क्षेत्रातील कामांचे मूल्यांकन करून या पुरस्कारांसाठी निवड केली जाईल. नामांकनाची माहिती पाठवल्यावर सन्मानपत्र व सन्मानचिन्हावर स्वतःचे नाव, आईचे नाव, आडनाव असेल तसेच महत्त्वाची बाब म्हणजे पुरस्कारांसाठी स्वागत मूल्य १ हजार रुपये शुल्क आकारले जाईल. पुरस्कारातून जी रक्कम जमा होईल, ती रक्कम पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरित करण्यासाठी वापरली जाणार आहे. तसेच सह्याद्री रत्न निलेश बापट यांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्याचा मानस वर्ल्ड फॉर नेचर इंडिया रत्नागिरी जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य यांचा आहे.




