
रत्नागिरीजवळील हातखंबा सुतारवाडी येथे घरफोडी, १० तोळे सोने चोरीला
रत्नागिरी तालुक्यात चोरट्यांचा उच्छाद सुरूच असून हातखंबा सुतारवाडी येथे चोरट्यांनी घर फोडून १० तोळे सोन्यासह ५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. मृणाल महेश पांचाळ (४८, रा. हातखंबा सुतारवाडी) यांनी याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. हातखंबा परिसरातच चोरट्यांनी घरफोडी केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. १ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पांचाळ यांच्या मालकीचे घर फोडले. चोरट्यांनी आपला मोर्चा लोखंडी कपाटाकडे वळविला. चोरट्यांनी हत्याराने कपाट उचकटून आतील १० तोळे सोन्यासह ५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.www.konkantoday.com




