
बहुजन चळवळीसाठी आयुष्य वाहून घेतलेले रत्नागिरीचे राजेंद्र आयरे यांचे दुःखद निधन
राजेंद्र लहू आयरे (वय ६९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही घटना मंगळवारी बदलापूर येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीत शोककळा पसरली आहे. परटवणे, अशोकनगर (रत्नागिरी) येथील रहिवासी असलेले राजेंद्र आयरे यांनी दीर्घकाळ बहुजन समाज पक्षात सक्रिय कार्य केले. बहुजन चळवळीसाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतले असून, समाजहितासाठी त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे ते कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते.
ते स्टरलाईट प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते आणि रत्नागिरीतील विविध सामाजिक प्रश्नांवर नेहमीच अग्रभागी राहिले. काही दिवसांपूर्वी ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बदलापूर येथे गेले होते, तिथेच अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह बदलापूर येथून रत्नागिरी येथे आणण्यात येणार असून, रात्री उशिरा त्यांच्या निवास्थानी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.




