
दापोली-पांगारी एसटी बस कलंडली, सुदैवाने जीवितहानी टळली.
दापोली येथील आगारातून दुपारी ११ वाजता सुटणारी दापोली-पांगारी ही बस गाड्यांच्या कमतरते अभावी दापोली आगारातून उशिरा सुटली होती. पांगारीहून पुन्हा दापोलीकडे परतत असताना पांगरी नवाशेत फार्महाऊस येथे पांगारी हद्दीत समोरून येणार्या दुचाकी स्वाराला साईड देत असताना रस्त्याची साईडपट्टी खचल्याने हळुहळू कलंडत एसटी बस पलटी झाली.मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडी (क्र. एमएच ०२-बीएल २२४४) ही गाडी चालक श्री. माणिक सांगडे व वाहक उमेश बेटकर हे फेरी घेवून जात होते. पांगरीहून दापोलीकडे परतीच्या प्रवासादरम्यान सदर अपघात झाला. सदरवेळी एसटीमध्ये इब्राहीम रूमाने (७०), फरीदा होडेकर (६०), व पूर्वा शिवलकर (३५) असे एकूण ३ प्रवासी होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.www.konkantoday.com




