
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेची पालपेणे कुंभारवाडी येथे बैठक उत्साहात
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी संस्थेचे संस्थापक नीलेश भगवान सांबरे, कार्याध्यक्ष धीरज नीलेश सांबरे, संस्थेचे सचिव केदार चव्हाण, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी विभाग गुहागर यांच्या वतीने समाजसेवक उमेश खैरे यांच्या प्रयत्नातून गुहागर तालुक्यातील कुंभारवाडी येथे जिजाऊ, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था विविध उपक्रम जनजागृतीपर बैठक उत्साहात झाली.
या बैठकीत जिजाऊ संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच रत्नागिरी येथे सुरू असलेल्या श्री. भगवान महादेव सांबरे हॉस्पिटलमधील विविध सुविधांबद्दल माहिती देण्यात आली. गुहागर येथे चालू असलेल्या पोलीस अकॅडमी भरती प्रशिक्षण केंद्र लायब्ररी याचीही माहिती देण्यात आली. तसेच पुढील काळात गुहागर तालुक्यात महिलांसाठी चालू करण्यात येणारे विविध उपक्रम त्यामध्ये शिलाई मशीन, मेहंदी कोर्स, कॉम्प्युटर क्लासेस आदींची सविस्तर माहिती देण्यात आली. समाजातील गोरगरीब जनतेला नीलेश भगवान सांबरे यांच्या स्व खर्चातून मोफत पुरवल्या जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी पालपेणे कुंभारवाडी येथे चैतन्य सांप्रदाय भजन विकास मंडळाचे माजी अध्यक्ष नथुराम हर्चीलकर, चंद्रकांत पालकर, जनसेवा युवा प्रतिष्ठान अध्यक्ष महेंद्र मांडवकर, जन विकास कमिटी सचिव निलेश टाणकर, परशुराम नांदगावकर, श्रीधर गमरे बापू संसारे अमित खांडेकर गीते पडवेकर यांच्यासह गावातील ११ वाड्यातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ ग्रामस्थ, महिला, युवक, युवती, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जिजाऊ संस्थेचे सदस्य अनंत डिंगणकर, ओंकार तिवरेकर, संजय गुप्ते या कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांचा समाजसेवक उमेश खैरे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांना धन्यवाद दिले.




