
कोकण रेल्वेचे करबुडे येथील कंट्रोल रूमचे कुलूप तोडून सीसीटीव्ही कॅमेरा चोरीच्या प्रयत्नात दोघांना अटक
कोकण रेल्वेचे करबुडे येथील कंट्रोल रूमचे कुलूप तोडून सीसीटीव्ही कॅमेरा चोरीच्या प्रयत्नात दोघांना अटक करण्यात आली आहे. ०१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० ते ०१:०० वाजेदरम्याने डीजे रूम, टनेल व्हेंटिलेशन कंट्रोल रूम, करबुडे, रत्नागिरी येथे चोरीचा प्रयत्न घडला.
या प्रकरणाबाबतच्या अहवालात असे म्हटले आहे की, , एका अज्ञात व्यक्तीने टीव्हीसीआर (टनेल व्हेंटिलेशन कंट्रोल रूम) च्या डीजे रूमचे शटरचे कुलूप तोडले, अनधिकृतपणे खोलीत प्रवेश केला, सीसीटीव्ही केबल तोडली आणि सीसीटीव्ही कॅमेरा चोरण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मिळाल्यावर, निरीक्षक रत्नागिरी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहिले, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, आवश्यक ती कारवाई केली आणि या प्रकरणाची गंभीर चौकशी सुरू केली.48 तासात दोन आरोपींना पकडण्यात आले असे कोकण रेल्वेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे




