
भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेली, तेव्हा घडलेल्या एका घटनेने सर्वांच्याच लक्ष्य वेधले
सध्या संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. कारण भारताच्या महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत महिला वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. खचाखच भरलेल्या डी. वाय.पाटील स्टेडियममध्ये भारताने इतिहास रचला. या ट्रॉफीची भारताला अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. मात्र, जेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौर ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेल्या, तेव्हा घडलेली एका घटनेने सर्वांचे लक्ष्य वेधले.
आयसीसीचे चेअरमन जय शाह ट्रॉफी घेऊन स्टेजवर उभे होते. हरमनप्रीत कौर नाचत स्टेजवर आल्या, तिने जय शाह यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर जय शाहांच्या पाया पडण्यासाठी पुढे आली, पण जय शाह यांनी अचानक हरमनप्रीत कौरला रोखलं. त्यांनी तसं करू दिलं नाही. उलट त्यांनी स्वतःच पुढे झुकून हरमनप्रीत कौर यांचा सन्मान केला. त्यामुळे जय शाह यांनी फक्त हरमनप्रीतचाच नाही, तर संपूर्ण भारतीय महिला संघाचा आणि देशातील मुलींचा मान वाढवला. ट्रॉफी देऊन ते तत्काळ स्टेजवरून उतरले, आणि त्यानंतर भारतीय संघाने आनंदात विजयाचा जल्लोष साजरा केला. ही संपूर्ण घटना आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.




