
प्रसिद्ध सिने आणि नाट्य अभिनेतेभाऊ कदम यांचा संवेदनशीलपणा; खेड मध्ये मित्राच्या घरी येऊन आईच्या प्रकृतीची चौकशी केली
खेड (प्रतिनिधी) – प्रसिद्ध सिने आणि नाट्य अभिनेते भाऊ कदम हे खेड येथे नाटकाच्या प्रयोगासाठी आले असताना त्यांनी आपल्या मित्राच्या आईची प्रकृती विचारण्यासाठी घरी भेट दिली. पत्रकार नंदेश खेडेकर यांच्या मातोश्रींची काही दिवसांपूर्वी वालावलकर रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. याची माहिती समजताच भाऊ कदम यांनी तत्काळ नंदेश खेडेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईची प्रकृतीची विचारपूस केली.
या भेटीमुळे कलाकारांमधील संवेदनशीलता, साधेपणा आणि आपुलकीचे दर्शन घडले. नंदेश खेडेकर यांचे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांशी दीर्घकाळाचे मैत्रीपूर्ण संबंध असून भाऊ कदम यांच्या या भेटीमुळे या संवेदनशील मैत्रीचे उदाहरण सर्वांसमोर आले आहे.



