
गिरनार (गुजरात) येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागर शृंगार तळी येथील तरुण व्यापाऱ्याचा पायऱ्या चढताना हृदयविकाराने मृत्यू
देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागर शृंगारतळी येथील एका तरुण व्यापाऱ्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे गिरनार येथे देवदर्शनासाठी गेला असताना त्याचाहृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. प्रसाद उर्फ बाळा रविंद्र संसारे (वय ४६, मु.पो. जानवळे, ता. गुहागर) असे या मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
प्रसाद हा गुहागर येथील एका ग्रुपबरोबर गिरनार येथे गेला होता. त्याचे गिरनार येथे जाणे हे अचानक ठरले होते.
गिरनार येथे पायऱ्या चढत असताना काल सकाळी सहा वाजता सुमारास घडली. या घटनेने श्रृंगारतळी बाजारपेठेसह तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. गुहागर तालुक्यातील बहुसंख्य तरुण गिरनार येथे शुक्रवारी संध्याकाळी देवदर्शनासाठी गेले होते. श्रृंगारतळी बाजारपेठेतील प्रतिष्ठीत व्यापारी रविंद्र स्टोअर्सचे मालक प्रसाद उर्फ बाळा रविंद्र संसारे (वय ४६, मु.पो. जानवळे, ता. गुहागर) हा तरुणदेखील गिरनारला गेला होता. शनिवारी सकाळी ६०० पायऱ्या चढून झाल्यावर तो जागीच कोसळला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती त्याच्यासोबतच्या मित्रांनी श्रृंगारतळीत त्याच्या नातेवाईकांना कळवली. प्रसाद संसारे यांच्या अचानक मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.




