
रत्नागिरी शहरात रस्त्यावर हाणामारी करणार्या दोघा संशयितांवर गुन्हा
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर गोडबोले स्टॉप येथे रस्त्यावर दंगा करणार्या दोघा संशयितांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ऋतीक बेरप्पा खेत्री (२०, रा. रविंद्रनगर कुवारबांव) व आकाश चंद्रकांत खेत्री (रा. क्रांतीनगर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित ३० ऑक्टोबर रोजी सकाळी कोणत्यातरी अज्ञात कारणातून एकमेकांना हाताच्या थापटाने मारहाण करून दंगा करत होते, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




