
रत्नागिरी तालुक्यातील जांभारी येथे चूल पेटविताना भाजून वृद्धा जखमी
रत्नागिरी तालुक्यातील जांभारी येथे चूल पेटवत असताना वृद्ध महिला भाजून जखमी झाली. ही घटना गुरूवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. तिला वाचविण्यासाठी गेलेला तिचा मुलगा देखील किरकोळ भाजला आहे.
फातिमा अब्दुल रहिमान पांगारकर (८८) व अस्लम पागारकर (रा. जांभारी, ता. रत्नागिरी) अशी भाजलेल्या वृद्धेचे व मुलाचे नाव आहे. फातिमा या बुधवारी सकाळी घरातील चूल पेटवित असताना चुलीत त्यांनी कागद व प्लास्टिक टाकल्याने अचानक आगीचा भडका उडाला. यात फातिमा यांच्या साडीने पेट घेतला. यामध्ये त्या ६० टक्के भाजल्या. त्यांना वाचविण्यासाठी मुलगा अस्लम गेला असता त्यांचे दोन्ही हात भाजले. नातेवाईकांनी उपचारासाठी तात्काळ दोघांनाही जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.
www.konkantoday.com




