
पोस्ट खात्याच्या योजनेमुळे परदेशात राहणार्या नातेवाईकांना पोहोचला घरचा फराळ
देशातील अनेक मुले तसेच नागरिक शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात आहत. त्यांना दिवाळीतून आपल्या घरचा फराळ मिळावा यासाठी यावर्षीही पोस्टखात्याने परदेशात फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या योजनेतून येथील पोस्ट कार्यालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील फराळ १३ देशांमध्ये पोहोचवला. या शुल्कातून १ लाख २२ हजार १३६ रुपयांचे उत्पन्न पोस्ट खात्याला मिळाले आहे.
परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी असलेल्या नागरिकांना आपल्या घरच्या फराळाची ओढ असते. त्यामुळे येथील नागरिक परदेशात फराळ पाठवत असतात. परदेशास्थित असलेल्या आपल्या नातेवाईकांना घरचा फराळ पोहोचण्याच्यादृष्टीने यंदाही पोस्टखात्याने तत्परता दाखवली. दिवाळीचा फराळ परदेशात पोहोचवण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली होती.www.konkantoday.com




