
चिपळुणात नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांच्या दालनासमोरच ठेकेदार व राजकीय पदाधिकार्यांमध्ये टेंडर कामे मॅनेज करण्यावरून धक्काबुक्की
गेल्या काही दिवसांपासून चिपळूण नगर परिषदेतून निघालेली करोडो रुपयांची विकासकामे मॅनेज करण्याचा प्रयत्न काही ठेकेदारांमध्ये सुरू आहे. यातूनच शुक्रवारी दुपारी १ वाजता एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांची ठेकेदाराबरोबर बाचाबाची होवून प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेले. विशेष म्हणजे मुख्याधिकार्यांच्या दालनासमोरच ठेकेदारांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने ते संतप्त झाले. यामुळे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी वाद करणार्यांसह सर्वांनाच पुन्हा असे केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नजिकच्या काळात नगर परिषदेच्या माध्यमातून करोडो रुपयांची विकासकामे होणार आहेत. ही कामे मॅनेज करण्यासाठी काही ठेकेदारांची धावपळ सुरू आहे.
www.konkantoday.com




