
समुद्रातील उसळणार्या लाटांमुळे राजापूर तालुक्यातील माडबन किनारी सुरुची शेकडो झाडे जमीनदोस्त
राजापूर तालुक्यातील माडबन समुद्र भाग किनार्यालगत धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्रातून उसळणार्या लाटांमुळे किनार्याचा भाग खचत चालला असून यामुळे किनार्यालगतची २०० पेक्षा अधिक सुरूची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. धूपप्रतिबंधक बंधार्यासाठी शासनाकडून निधी मंजूर असतानाही अद्याप बंधारा बांधण्याबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीची भावना आहे.
राजापूर तालुक्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला असून माडबन गावही समुद्रकिनार्यालगत वसले आहे. पर्यटनदृष्ट्याही माडबन समुद्र किनार्याला विशेष महत्त्व आहे. या समुद्र किनार्यालगत मोठ्या प्रमाणात सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत लाटांच्या मार्यामुळे किनार्याचा भाग खचत चालला असून सुरूची शेकडो झाडे जमीनदोस्त झाली आहेत. माडबन किनार्यावर धूपप्रतिबंधक बंधारा बांधावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ करत आहेत.www.konkantoday.com




