
विकास नर यांची ‘अभंगवारी’ आकाशवाणीवर
आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती...
रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला ‘अभंग वारी’ हा कार्यक्रम कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रसारित होणार आहे. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर सिंधुदुर्ग येथील गायक विकास नर आणि सहकारी यांनी सादर केलेला अभंगांचा कार्यक्रम अभंग वारी प्रसारीत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला अजित गोसावी आणि पंडीत अवधूत बाम यांच संगीत असून हार्मोनियम विकास नर, पखवाज दर्शन घाडीगावकर, तबला पंकज सावंत यांची साथसंगत लाभली आहे. कोरस नागेश घोगरे, प्रफुल्ल गावडे, संतोष तळेकर, रघुनाथ परब, राजेश खानोलकर, श्रीपाद बाणे, शशांक तळेकर, अंकित घाडीगावकर यांनी दिला आहे.
या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. सुनील गायकवाड असून हा कार्यक्रम मध्यम लहरी ११४३ किलो हर्ट्झ तसेच १०१.५. मेगा हर्टझ या एफएम वाहिनीवर आणि न्यूज ऑन एआयआर या लाईव्ह मोबाईल ॲपवर ऐकता येईल. रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.




