
राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील ७४ वर्षीय वृद्धेच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीचा अजूनही तपास नाही…
राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील ७४ वर्षीय वृद्धेच्या निर्घृण हत्येचा तपास पंधरा दिवस उलटूनही लागलेला नाही. या खुनामागील नेमके कारण काय आणि ही क्रूर हत्या कोणी केली, याचे गूढ अद्याप कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी कसून चौकशी करत आहे. मात्र मारेकर्यांचा कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. स्थानिक पोलीस गुन्हे अन्वेषण शाखा आणि वरिष्ठ अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाही, तपास मात्र एका विशिष्ट निष्कर्षांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. या गंभीर परिस्थितीत विभागीय अधिकारी लांजा सुरेश कदम आणि राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी रायपाटण दूरक्षेत्र येथे आले असता ग्रामस्थांना एक महत्वाचे आवाहन केले आहे.www.konkantoday.com




