
रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग इमारत नूतनीकरण शुभारंभ
आज रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या शुभारंभाचा कार्यक्रम राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारती उभारण्याचा निर्णय घेतला होता, याची आठवण करून दिली. ग्रामीण भागात — अगदी मंडणगडसारख्या ठिकाणी — देशातील पहिलं न्यायालय उभारण्यात आपण यशस्वी झालो, ही महाराष्ट्रासाठी आणि रत्नागिरीसाठी अभिमानाची बाब आहे.
वकील बांधव हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांचं समाधान हे न्यायिक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेशी थेट जोडलेलं आहे. म्हणूनच वकिलांसाठी आवश्यक सुविधा, बसण्याच्या खुर्च्या, तसेच न्यायालयीन परिसराच्या उन्नतीसाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिलं.
रत्नागिरी जिल्ह्याची न्यायिक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ करण्याचा निर्धार मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पुन्हा व्यक्त केला.




