
युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत ॲक्शन मोडवर.

युवासैनिकांमध्ये नवचैतन्य
रत्नागिरी : रत्नागिरी, लांजा-राजापूर आणि चिपळूण-संगमेश्वर या तीन विधानसभा क्षेत्रासाठी प्रसाद सावंत यांची युवासेना जिल्हाप्रमुख म्हणून नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. निवड होताच प्रसाद सावंत यांनी या तिन्ही विधानसभा क्षेत्रात दौरा करून युवासेनेचा आढावा घेतला. त्यांच्या या दौऱ्याने युवासैनिकांमध्ये जोश निर्माण झाला आहे.
गेले कित्येक महिने युवासेनेचे जिल्हाप्रमुख पद रिक्त होते. प्रसाद सावंत यांच्या रूपात एक डॅशिंग चेहरा शिवसेना पक्षाने समोर आणला. निवड होताच त्यांनी आपल्या कामाला सुरवातही केली.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभेच्या तालुका आणि शहर कार्यकारणीच्या माध्यमातून त्यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. मार्गदर्शन करताना काही सूचना देत युवासेनेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. शिवसेना जिल्हाप्रमुख युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य विक्रांत जाधव, शिवसेना तालुका प्रमुख बळीराम गुजर यांनीही युवासैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख उमेश खताते, युवासेना शहर प्रमुख पार्थ जागुष्टे, युवतीसेना तालुका शिवानी कासार यांच्यासह उपतालुका, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख उपशहर प्रमुख उपस्थित होते.
संगमेश्वर तालुका कार्यकरणीत रिक्त पदांवर चर्चा होऊन ही पद तात्काळ भरण्याच्या सूचना प्रसाद सावंत यांनी दिल्या. सहसचिव प्रद्युम्न माने आणि शिवसेना तालुका प्रमुख बंड्या बोरुकर यांनीही मार्गर्शन केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख दादा शिंदे, युवासेना उपतालुका प्रमुख तेजस भाटकर, संदेश घाग, युवासेना शहर प्रमुख अमर गवाणकर, पारस साखरे, निखिल जाधव, अजिंक्य कीर, तालुका सचिव प्रदीप ढवळ उपस्थित होते.
राजापूर-लांजा तालुका कार्यकारणी आढावा बैठकही जोशात पार पडली. अनेक विषयांवर चर्चा होऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन नियुक्त्या करण्याच्या सूचना प्रसाद सावंत यांनी दिल्या. राजापुर तालुका कार्यकारणी बैठकीला शिवसेना राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भोवड, शहर संपर्क प्रमुख सत्यवान कदम, युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष हातणकर, शिवसेना उप तालुकाप्रमुख अभिजीत तेली, युवासेना तालुका प्रमुख सुभाष नवाले तसेच युवतीसेना पदाधिकारी उपस्थित होते.
लांजा तालुका कार्यकारणी बैठकीला युवासेना सहसचिव प्रद्युम्न माने, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश करंबळे, शहर प्रमुख मोहन तोडकरी, महिला शहर संघटक सिया लोध, युवासेना उप जिल्हाप्रमुख संतोष हातणकर, युवा तालुका प्रमुख अभिजीत शिर्के आदी उपस्थित होते.




